Saurabh Netravalkar: पाकिस्तानला सुपर ओव्हरमध्ये धूळ चारणाारा सौरभ मुंबईतून कसा पोहचला अमेरिकेत? जाणून घ्या प्रवास

USA vs Pakistan: अमेरिकेला पाकिस्तानविरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवून देण्यात मुंबईत जन्मलेल्या सौरभ नेत्रावळकरने मोलाचा वाटा उचलला.
Saurabh Netravalkar | T20 World Cup
Saurabh Netravalkar | T20 World CupSakal

Who is Saurabh Netravalkar: टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये गुरुवारी (6 जून) अमेरिका संघानं माजी विजेत्या पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. अंत्यत रोमांचक झालेल्या या सामन्यात अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारली. अमेरिकेच्या या विजयात भारतीय वंशाच्या सौरभ नेत्रावळकरने मोलाचा वाटा उचलला.

सुपर ओव्हरमध्ये त्याने अमेरिकेसाठी गोलंदाजी करताना त्याने 19 धावांचा बचाव केला आणि त्याच्या संघाला विजय देखील मिळवून दिला. त्याआधी सामन्यातही त्याने 4 षटकात अवघ्या 18 धावा देत मोहम्मद रिझवान आणि इफ्तिखार अहमद यांच्या विकेट्स घेतल्या होत्या.

त्यामुळे अमेरिकेच्या क्रिकेट चाहत्यांसाठी तो हिरो झाला. पण मुंबईत जन्मलेला सौरभ अमेरिकेत कसा पोहचला हा प्रश्न अनेकांना पडला असेल, त्याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊ.

Saurabh Netravalkar | T20 World Cup
USA vs PAK : युएसएने इतिहास रचला! मुंबईकर नेत्रावळकरची सुपर ओव्हरमध्ये सुपर बॉलिंग, पाकिस्तानचा पराभव

16 ऑक्टोबर 1991 साली क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईत सौरभचा जन्म झाला. सौरभनेही अनेक मुंबईकरांप्रमाणे क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. तो मुंबईकडून वयोगटातील क्रिकेटही खेळू लागला.

2008-09 च्या कुच बिहार ट्रॉफी स्पर्धेत त्याने 6 सामन्यांत 30 विकेट्स घेतल्या. त्याची कामगिरी पाहता त्याची 2010 साली न्युझीलंडमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कपसाठीही भारतीय संघात निवड झाली.

त्याने 19 वर्षांखालील वर्ल्ड कप 2010 स्पर्धेतही उल्लेखनीय कामगिरी केली. तो भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता. त्याने 8 विकेट्स घेतल्या होत्या. तो त्यावेळी केएल राहुल, हर्षल पटेल, मयंक अगरवाल अशा भारतीय संघाकडून खेळलेल्या खेळाडूंबरोबर खेळलेला. त्याच वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान संघात बाबर आझमही होता.

मात्र क्रिकेटसाठी वेडा समजल्या जाणाऱ्या भारतात स्पर्धाही कमी नाही. प्रयत्न करूनही सौरभला म्हणावी तशी संधी मिळाली नाही. तो 2013 मध्ये मुंबईकडून एकमेव रणजी सामना खेळला, ज्यात त्याने कर्नाटकविरुद्ध 3 विकेट्स घेतल्या.

Saurabh Netravalkar | T20 World Cup
USA vs PAK : युएसएने पाकिस्तानचा निम्मा संघ शंभरच्या आत गुंडाळला; आफ्रिदीनं पार करून दिला 150 धावांचा टप्पा

यादरम्यान त्याने कंप्युटर सायन्समधील पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर त्याने पुढील शिक्षणासाठी अमेरिका गाठली. तो अमेरिकेत ओरॅकल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करू लागला.

असे असले तरी क्रिकेट मात्र त्याचे सुटले नव्हते. तो वेळ मिळेल, तसा क्रिकेट खेळत होता. त्याला त्याचं काम आणि क्रिकेट याचा मेळ साधायचा होता. त्यानेही ही तारेवरची कसरत केली आणि त्याचं फळ त्याला मिळालं. त्याला अमेरिकेच्या राष्ट्रीय संघात जागा मिळाली.

अमेरिका क्रिकेटमध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न करत असताना सौरभ या संघाकडून खेळू लागला. त्याने 2019 ते 2021 दरम्यान 27 आंतरराष्ट्रीय सामन्यात अमेरिका संघाचे कर्णधारपदही सांभाळले. यादरम्यान त्याने 11 विजय आणि 15 पराभव स्विकारले.

डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या सौरभने आत्तापर्यंत 48 वनडे खेळले असून 73 विकेट्स घेतल्या, तर 29 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 29 विकेट्स घेतल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com