कोण होणार ‘टी-२०’चा विश्वविजेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cricket-world-cup

cricket-world-cup : कोण होणार ‘टी-२०’चा विश्वविजेता

sakal_logo
By
सुनंदन लेले : सकाळ वृत्तसेवा

दुबई : कोणीही अपेक्षा केली नव्हती ते संघ टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आमनेसामने आले आहेत. उद्या दुबईतील निर्णायक सामन्यातून या विश्वकरंडक स्पर्धेला नवा विजेता मिळणार आहे. पाच वेळा एकदिवसीय विश्वकरंडक जिंकलेला असला तरी ऑस्ट्रेलिया टी-२० विश्वकरंडकाच्या प्रतीक्षेत आहे, तर दोन वर्षांपूर्वी एकदिवसीय विश्वकरंडक पराभूत न होताही हातून निसटलेला न्यूझीलंडचा संघ आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीवर विजेतेपदाची मोहोर उमटविण्यास सज्ज झाला आहे.

साखळीतील कामगिरीनंतर इंग्लंड आणि पाकिस्तान या दोघांकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते, परंतु या दोघांना पराभवाचे धक्के दिल्यामुळे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांनी आपली क्षमता आणि दावेदारी दाखवून दिली आहे. आता एकमेकांपेक्षा कोण सरस ठरणार याची उत्सुकता जेवढी या एकमेकांच्या शेजारी असलेल्या देशांना आहे तेवढीच क्रिकेटविश्वालाही आहे.

हेही वाचा: सानिया म्हणते, नवऱ्याला माजी फिकीरच नाही; व्हिडिओ व्हायरल

न्यूझीलंडचे सातत्य

इतिहास तपासला तर स्पष्ट दिसते की, गेल्या काही वर्षांतील आयसीसीच्या विविध स्पर्धांत ऑस्ट्रेलियापेक्षा न्यूझीलंड संघाने अधिक सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. २०१९ मध्ये झालेल्या एक दिवसीय विश्‍वकरंडकामध्ये न्यूझीलंड संघाने अप्रतिम खेळ करून अंतिम सामन्यात धडक मारली. जिथे धावांमुळे नव्हे तर आयसीसीच्या विचित्र नियमामुळे न्यूझीलंडला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले. नंतर झालेल्या पहिल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याच न्यूझीलंड संघाने गाजावाजा न करता अंतिम सामन्यात धडक मारली आणि शेवटी भारतीय संघाला व्यवस्थित पराभूत करून विजेतेपदावर हक्क सांगितला. आणि आता टी-२० विश्वकरंडकाच्या अंतिम फेरीतही धडक मारली आहे. या सातत्याला कारण आहे अप्रतिम फलंदाजीबरोबर चतुर नेतृत्व करणारा केन विल्यमसन.

ऑस्ट्रेलियाची चिंता मधल्या फळीची

मधल्या फळीतील फलंदाजांनी खूप सातत्य न दाखवूनही ऑस्ट्रेलियन संघ अंतिम सामन्यात पोचला आहे, हे सत्य नाकारून चालणार नाही. फलंदाजीत गडबड होत असताना गोलंदाजांनी चोख कामगिरी केली आहे. स्टार्क- हेझलवूड- कमिन्स त्रिकुटाने १८ फलंदाज बाद केले असताना एकट्या अ‍ॅडम झँम्पाने १२ खेळाडूंना बाद करण्याचा सपाटा लावला आहे. सलामीची जोडी फिंच - वॉर्नर सातत्य राखून आहे, पण स्टीव्ह स्मिथ सकट मधल्या फळीतील खेळाडू अपेक्षित साथ देत नाहीत. हाच कच्चा दुवा पाकिस्तानने हेरला होता, फक्त स्टॉयनिस - वेड जोडीने संघाला पैलतीरी नेणारी भागीदारी केली.

loading image
go to top