सानिया म्हणते, नवऱ्याला माजी फिकीरच नाही; व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sania Mirza and Shoaib Malik
सानिया म्हणते, नवऱ्याला माजी फिकीरच नाही; व्हिडिओ व्हायरल

सानिया म्हणते, नवऱ्याला माजी फिकीरच नाही; व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
सुशांत जाधव

टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा पाकिस्तानच्या सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थिती राहिल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक मॅचवेळी ती आपला पती आणि पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज शोएब मलिकला प्रोत्साहन देत होती. सामन्यावेळी सानिया मिर्झाचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्याचेही दिसले. त्यात आता आणखी भर पडली आहे. सेमी फायनलमध्ये पाकिस्तान संघाचा खेळ खल्लास झाल्यानंतर सानिया मिर्झाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसते. यात सानिया मिर्झा आपल्या नवऱ्याची तक्रार करताना दिसते.

हेही वाचा: खान साब तुमची जिद्द नडली! पाक आउट झाल्यावर हे ट्वीट व्हायरल

सानिया मिर्झा सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून ती चर्चेत असते. आता तिने इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केलाय. यात ती एका चित्रपटातील डायलॉगवर अभिनय करताना पाहायला मिळते. ज्याला तुमची किंमत नाही त्याच्यापासून दूर रहा या आशयाचा ("बेटा हमेशा उन लोगों से दूर रहो, जिसको तुम्हारी कद्र न हो) डायलॉग ऐकायला मिळतो. यावेळी सानिया मिर्झा शोएबकडे कॅमेरा फिरवून त्याची तक्रार करताना दिसते. हा व्हिडिओ सानियाने आपल्या रुममध्ये शूट केल्याचे दिसते. तिच्या मागे बेडवर शोएब मलिक बसला आहे. तो लॅपटॉपमध्ये काहीतरी पाहत बसल्याचे वाटते.

हेही वाचा: सानिया मिर्झाचा नवरा शोएब मलिकचं पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत हॉट फोटोशूट

सानिया मिर्झा गेल्या काही दिवसांपासून टेनिस कारकिर्दीत नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरली आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये तिने चीनच्या शुआई झांगच्या साथीने ओस्ट्रावा ओपन स्पर्धा जिंकली होती. सानियाने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत 6 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. महिला दुहेरीत 2016 मध्ये तिने ऑस्ट्रेलियन ओपन, 2015 मध्ये विम्बल्डन आणि युएस ओपन, मिश्र दुहेरीत 2009 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2014 मध्ये युएस ओपन स्पर्धा जिंकली होती.

loading image
go to top