World Cup 2023: बालिश! फायनलसाठी कपिल देव यांना निमंत्रण न दिल्यानं काँग्रेसचा BCCIवर हल्लाबोल

वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अनेक दिग्गज माजी खेळाडूंना बोलावण्यात आलं नव्हतं.
Kapil Dev IPL 2023
Kapil Dev IPL 2023

World Cup Final 2023: क्रिकेट वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला. अवघ्या देशाचंच नव्हे तर सर्व सेलिब्रेटीज आणि महत्वाच्या माजी खेळाडूंनी प्रत्यक्ष नरेंद्र मोदी स्टेडियमवर हजेरी लावली.

पण या सामन्यासाठी भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार आणि ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव यांना मात्र बीसीसीआयनं निमंत्रणच दिलं नाही.

खुद्द देव यांनी हा खुलासा केल्यानं सर्वत्र प्रतिक्रिया उमटायला लागल्या आहेत. काँग्रेसनं देखील यावरुन बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. (World Cup 2023 Childish Congress targated BCCI for rejecting Kapil Dev invitation)

Kapil Dev IPL 2023
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : भारत-पाकिस्तान सीमेवर शिवरायांचा पुतळा; मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार अनावरण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर म्हटलं की, "कपिल देव यांना निमंत्रण न देणं हा खूपच बालिश आणि अस्विकारार्ह प्रकार आहे. बिशनसिंह बेदी यांच्यासह कपिल देव देखील आपली भूमिका बिनधास्तपणे मांडतात. काही दिवसांपूर्वी आंदोलन करणाऱ्या महिला पहलवानांच्या समर्थनार्थही ते बोलले होते" (Latest Marathi News)

Kapil Dev IPL 2023
सरकारचा मोठा निर्णय! 'या' क्षेत्रात उपलब्ध होणार 50 हजार नोकऱ्या, देशात येणार मोठी गुंतवणूक

कपिल देव यांनी काय म्हटलं?

क्रिकेट वर्ल्डकपची मॅच सुरु होण्यापूर्वी कपिल देव एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना त्यांना विचारलं की, तुम्ही फायनल सामन्यात का गेले नाही. त्यावर त्यांनी म्हटलं की, मला निमंत्रणच देण्यात आलं नाही. (Marathi Tajya Batmya)

मला तुम्ही बोलावलं तर मी इथं आलो, तिथं बोलावलं नाही तर नाही गेलो, बस्स इतकंच कारण आहे. माझी तर इच्छा होती की आमच्या पूर्ण ८३ च्या टीमला बोलावलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. पण इतकं काम सुरु आहे, इतके लोक आहेत, इतक्या जबाबदार आहेत त्यामुळं लोक कधीकधी विसरुन जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com