Liam Dawson retires from first-class cricket immediately
esakal
England all-rounder Liam Dawson retirement news: हॅम्पशायर आणि इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम डॉसन याने प्रथम-श्रेणी क्रिकेटमधून ( रेड बॉल क्रिकेट) तात्काळ निवृत्ती घेतली आहे. ३६ वर्षीय डॉसन ब्लास्ट आणि वन-डे कपमध्ये हॅम्पशायरचे प्रतिनिधित्व करत राहील. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दीर्घ काळ खेळण्यासाठी त्याने रेड-बॉल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. डॉसनने हॅम्पशायरसाठी रेड-बॉल क्रिकेटमध्ये २०० हून अधिक सामने खेळले असून, त्यात १०,००० हू्न अधिक धावा आणि ३५० हून अधिक बळी घेतले आहेत.