

IPL 2025 New Rules: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या तोंडावर १५ कठोर नियम आणले आहेत आणि त्यामुळे खेळाडूंची गोची झाली आहे. बीसीसीआयने नुकतेच भारतीय खेळाडूंच्या कुटुंबियांसाठी नियमावली जाहीर केली होती. तसेच नियम आयपीएलसाठीही आणले गेले आहेत. नियमानुसार आता खेळाडूंना संघाच्या बसमधूनच प्रवास करावा लागणार आहे आणि हाच नियम आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान भारतीय खेळाडूंना कठोरपण पाळायला सांगितला गेला होता.