Priyansh Arya creates history in SMAT by surpassing KL Rahul's 152* to record the highest T20 score by an Indian male cricketer
esakal
Priyansh Arya record-breaking innings in Syed Mushtaq Ali Trophy: पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रियांश आर्यने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत दिल्लीचे नेतृत्व करताना मंगळवारी वादळी खेळी केली. तामिळनाडूच्या गोलंदाजांचा पालापाचोळा करताना विक्रमी शतक झळकावले. ३६ चेंडूंत शतक पूर्ण करण्यासाठी त्याने तब्बल १२ षटकार खेचले. त्यानंतर त्याचे वादळ इथेच थांबले नाही, तो ट्वेंटी-२०त द्विशतक पूर्ण करतोय असे चित्र होते. पण,त्याला अगदी थोडक्यात द्विशतकापासून वंचित रहावे लागले. पण, त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्येचा भारतीयाचा विक्रम नावावर केला.