Team India: २०२७ वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची तयारी सुरू; गंभीर-गिलच्या मागणीनंतर BCCIने उचललं मोठं पाऊल, नेमकं काय होणार?

TEAM INDIA STARTS PREPARATION FOR 2027 WORLD CUP: २०२७च्या वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. गौतम गंभीर आणि शुभमन गिल यांच्या मागणीनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४ ते ६ सामन्यांची वनडे मालिका खेळवण्याबाबत BCCI आणि क्रिकेट साऊथ आफ्रिकामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
Team India

Team India

esakal

Updated on

TEAM INDIA STARTS PREPARATION FOR 2027 WORLD CUP: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) एक अत्यंत महत्त्वाची आढावा बैठक गुरुवारी (३ सप्टेंबर) मुंबईत पार पडली. या बैठकीला भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुभमन गिल तसेच टी-२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर उपस्थित होते.

मात्र, या बैठकीपूर्वी रोहित शर्मा यांच्या भविष्यावरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात होतं. आता बैठकीनंतर BCCIचे सचिव देवजित सैकिया यांनी रोहित शर्माच्या भविष्याबाबत स्पष्ट वक्तव्य केलं आहे. रोहित शर्मा सध्या ज्या सामन्यांमध्ये खेळत आहेत, त्यात चांगली फलंदाजी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची आवश्यकता नाही, असं सैकिया यांनी स्पष्ट केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com