MS Dhoni ६८३ दिवसांनंतर चेपॉकवर कर्णधार म्हणून आज परतला आहे. ४३ वर्षीय, २७८ दिवसांचा धोनी हा आयपीएलमधील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. पण, दुसरीकडे कॅप्टन कूल धोनीपेक्षा वयाने २१ वर्षाने मोठ्या असलेल्या जोआना चाइल्ड ( Joanna Child ) यांनी वयाच्या ६४ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये पदार्पण करून इतिहास रचला आहे. पोर्तुगालच्या जोआनाने नॉर्व्हेविरुद्धच्या सामन्यात खेळताना वय हा फक्त एक आकडा आहे, हे सिद्ध केले.