
38th National Games: पालघरच्या धिर्ती अहिरवाल हिने ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील जलतरणच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम केला. जलतरणातील महिलांच्या चार बाय २०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात रौप्यपदक, तर पुरुषांच्या चार बाय २०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले. नेमबाजीमधील १० मीटर रायफल मिश्र दुहेरीत आर्या, रुद्रांक्षने रौप्यपदक पटकाविले. सोलापूरच्या ईशा वाघमोडे हिने डायव्हिंगमध्ये ब्राँझपदकाची कमाई केली.