David Warner breaks Virat Kohli most T20 hundreds record
esakal
Virat Kohli T20 record broken by David Warner : ३९ वर्षीय डेव्हिड वॉर्नरने बिग बॅश लीगमध्ये पुन्हा धावांचा पाऊस पाडला. सिडनी थंडर्स संघाकडून खेळणाऱ्या वॉर्नरने BBL च्या या पर्वातील दुसरे शतक झळकावले. सिडनी डर्बीमध्ये वॉर्नरने सिडनी सिक्सर्स संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याने ६५ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांसह ११० धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला ६ बाद १८९ धावांपर्यंत पोहोचवले. वॉर्नरने आजच्या शतकासह भारताचा स्टार विराट कोहली याचा विक्रम मोडला. ट्वेंटी-२० मध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत वॉर्नरने आगेकूच केली आहे.