

क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी धावसंख्येचा यशस्वी बचाव केल्याचा आणि सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआऊटचा रेकॉर्ड नोंदवला गेलाय. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ही घटना घडली असून २३२ वर्षे जुना विक्रम मोडला आहे. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या प्रेसिडेंट्स ट्रॉफीत पाकिस्तान टीवी संघाने सुई नॉर्दन गॅस विरोधात ४० धावांचा बचाव केला. पीटीवीने हा सामना फक्त २ धावांनी जिंकत विश्वविक्रम केला. याआधी १७९४मध्ये लॉर्ड्सवर ओल्डफिल्ड संघाने एमसीसीविरुद्ध ४१ धावांचा यशस्वी बचाव करत ६ धावांनी विजय मिळवला.