No Pakistani Players Picked in The Hundred 2025 Draft: पाकिस्तान क्रिकेट संघाची पुन्हा एकदा जगासमोर नाचक्की झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अपयशानंतर पाकिस्ताचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर दाखल झाला आहे, परंतु तिथे पाऊल ठेवण्यापूर्वीच त्यांच्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे. इंग्लंडच्या The Hundred २०२५ लीगसाठी पाकिस्तानच्या ४५ पुरुष व ५ महिला खेळाडूंनी नोंदणी केली होती, पण एकाही खेळाडूला फ्रँचायझीने संघात घेण्यात रस दाखवला नाही. पाकिस्तानच्या या वस्त्रहरणाला आयपीएल फ्रँचायझी जबाबदार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.