Toby Albert follows Yuvraj Singh six sixes feat
esakal
Toby Albert six sixes viral video in One-Day Cup 2026: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वन डे कप स्पर्धेदरम्यान हॅम्पशायरचा फलंदाज टॉबी अल्बर्टने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने सहा चेंडूंत सहा षटकार खेचण्याचा पराक्रम केला. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्शेल गिब्सने २००७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत नेदरलँड्सविरुद्ध एका षटकात सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला. भारताच्या युवराज सिंगने २००७ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सहा चेंडूंवर सहा षटकार खेचले होते. टोबीनेही असाच पराक्रम केला, परंतु त्याची पद्धत वेगळी होती.