India probable playing XI for 1st Test against New Zealand 2026
esakal
India playing XI selection dilemma for first Test against New Zealand : ट्वेंटी-२० अन् वन डे मालिका जिंकल्यानंतर टीम इंडिया खऱ्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी भारताला दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. पण, यजमान न्यूझीलंड या फॉरमॅटमध्ये भारताला चांगली टक्कर देण्यासाठी तयारीला लागले आहेत. अशात भारतीय संघही त्यांचे सर्वोत्तम ११ खेळाडू मैदानावर उतरवणार आहेत आणि कर्णधार शुभमन गिल ( Shubman Gill) याने प्लेइंग इलेव्हनबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.