Lancashire take 6 wickets in 6 deliveries across two T20 Blast games: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या Vitality Blast T20 स्पर्धेत लँकेशायर संघाने अजब विक्रम नावावर केला. या संघाने शुक्रवारी नॉर्थहॅम्पटनशायर संघाविरुद्ध शेवटच्या चार चेंडूंवर चार विकेट्स घेतल्या आणि शनिवारच्या लढतीत डर्बिशायर संघाविरुद्ध पहिल्या दोन चेंडूंत विकेट्स घेऊन पराक्रम नावावर केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सलग सहा चेंडूंत ( दोन वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मिळून) सहा विकेट्स घेणारा हा जगातील पहिलाच संघ असावा.