63 PAKISTAN PLAYERS REGISTER FOR HUNDRED 2026, NO BABAR AZAM OR MOHAMMAD RIZWAN
esakal
Full list of Pakistan players in Hundred 2026 auction: कर्णधार सलामान अली आघा, शाहीन आफ्रिदी, सैम आयुब आणि उस्मान तारीक यांनी लंडन येथे पुढील महिन्यात पार पडणाऱ्या दी हंड्रेडच्या लिलावासाठी नाव नोंदवली आहेत. या लिलावासाठी एकूण ७१० आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक खेळाडूंनी नावे नोंदवली असून त्यात ६३ पाकिस्तानी खेळाडूंची नावं आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या लीगमधील ८ पैकी निम्म्याहून अधिक फ्रँचायझींनी पाकिस्तानी क्रिकेटपटूंना करारबद्ध करणार नसल्याची भूमिका घेतलेली आहे. तरीही पाकिस्तानी खेळाडूंनी नावं नोंदवली आहेत. बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिकेमुळे या लिलावात सहभाग घेतलेला नाही.