ENG vs NZ 3rd Test: बेन स्टोक्सचा भीमपराक्रम! जॅक कॅलिसनंतर जगात असा विक्रम नोंदवणारा तोच; इंग्लंडच्या कर्णधाराने केली हवा...

England Captain Ben Stokes Scripts Test History: इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत आणखी एका ऐतिहासिक टप्प्याला गवसणी घातली. कसोटी इतिहासात हा पराक्रम करणारा तो केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे
England Captain Ben Stokes Scripts Test History

England Captain Ben Stokes Scripts Test History

esakal

Updated on

ENG vs NZ 3rd Test Ben Stokes joins Jacques Kallis elite club: न्यूझीलंडने तिसऱ्या कसोटीत पकड घेतली असली तरी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स चमकला. बारमधील राड्यानंतर स्टोक्सला दुसऱ्या कसोटीला मुकावे लागले होते आणि ती कसोटी इंग्लंडने गमावली होती. त्यामुळे मालिका १-१ अशा बरोबरीत आली आणि तिसरी कसोटी मालिका विजयाच्या दृष्टीने महत्त्वाची झाली आहे. पण, किवींच्या सलामीवीरांनीच इंग्लंडचे कंबरडे मोडले. मात्र, बेन स्टोक्सने गोलंदाजीत चमक दाखवली. ४ विकेट्स घेत त्याने असा एक पराक्रम नावावर केला, जो कसोटी इतिहासात फक्त जॅक कॅलिसच्या नावावर होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com