Why Jalaj Saxena never played for India
esakal
India Test squad Sri Lanka Marathi Cricket news : ऑफ स्पिनर सारांश जैन याला भारताच्या कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने केली आणि १५ सदस्यीय संघात मध्य प्रदेशचा सारांश जैन, हे नाव नवीन आहे. वॉशिंग्टन सुंदर पहिल्या सामन्याला मुकणार असल्याने सारांशची निवड महत्त्वाची बनली आहे. श्रीलंकेच्या डावखुऱ्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान सारांशला पेलावे लागणार आहे. पण, या निवडीने एक प्रश्नही उपस्थित केला आहे. तो म्हणजे, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारतासाठी ७ हजाराहून अधिक धावा अन् ५०० हून अधिक विकेट्स घेणाऱ्या जलज सक्सेना ( Jalaj Saxena ) याला का संधी मिळाली नाही.