
क्रिकेटपटूंची फोटो दाखवून फसवणुक करण्याचे यापूर्वी अनेक प्रकरणं घडली आहेत. त्यात आणखी एकाची भर पडली आहे. हैदराबाद येथे बनावट कॉफी पावडर उत्पादन कंपनीत २.८ कोटी रुपये गुंतवून फसवणूक झाल्यानंतर एका ६० वर्षीय व्यावसायिक महिलेने तिच्या भावासह सहा जणांविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली आहे. गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याचे आश्वासन देणारी ५.७ कोटी रुपयांची गुंतवणूक योजना या सहा जणांनी आणली होती. पण, प्रत्यक्षात हा एक घोटाळा ठरला आणि त्यामुळे त्या महिलेसह इतरांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.