Fan's Catch with a Drink in Hand and Ball in OtherSakal
Cricket
ENG vs SL: एका हातात ड्रिंक अन् दुसऱ्या हातात बॉल, प्रेक्षकानं घेतला भन्नाट झेल, Video Viral
Fan's Catch with a Drink in Hand and Ball in Other: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यात एका प्रेक्षकाने एका हातात ड्रिंक असताना दुसऱ्या हाताने अफलातून झेल घेतला, ज्याचा व्हिडिओही सध्या चर्चेत आहे.
England vs Sri Lanka, 1st test: क्रिकेटमध्ये अनेकदा खेळाडूंनी अफलातून झेल घेतलेले क्रिकेट प्रेमींनी पाहिले असतील. पण असाच एक भन्नाट झेल इंग्लंड विरुद्ध श्रीलंका संघादरम्यानच्या कसोटी सामन्यात एका प्रेक्षकाने घेतलाय, ज्याचा व्हिडिओही सध्या चर्चेत आहे.
मँचेस्टर येथे २१ ऑगस्टपासून इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सुरू आहे. या सामन्यात तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव सुरू असताना ८३ व्या षटकात श्रीलंकेकडून असिथा फर्नांडो गोलंदाजी करत होता.