Aaryavir Sehwag scores unbeaten 70 against Nepal in U19 Asia Cup
esakal
Asian Cricket Council Under-19s Asia Cup : भारतीय संघाने १९ वर्षांखालील संघांच्या आशिया चषक स्पर्धेत विजयी सलामी दिली. इशान सूद व अर्जुन राजपूत यांच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळच्या संघाला धापा टाकाव्या लागल्या आणि त्यानंतर कर्णधार लक्ष्य रायचंदानी आणि आर्यवीर सेहवाग या सलामीच्या जोडीने दणदणीत विजय मिळवून दिला. आता भारताचा पुढील सामना येत्या रविवारी कट्टर पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.