
AB de Villiers returns to cricket after 4 years : जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाजी बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलिर्स ४ वर्षांनंतर पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. वर्ल्ड चॅम्पियन्सशीप लेजेंड्स (WCL) स्पर्धेत एबी डिव्हिलिर्स पुन्हा मैदानावर फटकेबाजी करताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत एबी गेम चेंजर्स दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व करणार आहे.