Irani Cup: मुंबईच्या ५३७ धावा; शेष भारताचा अभिमन्यू ईश्वरन खंबीरपणे उभा राहिला, द्विशतकाच्या जवळ पोहोचला

Mumbai vs Rest of India: इराणी कपमध्ये मुंबईने शेष भारताविकरूद्ध पहिल्या डावात ५३७ धावा उभारल्या असून प्रत्युत्तरात अभिमन्यू ईश्वरनने १५१ धावांची खेळी केली आहे.
Abhimanyu Easwaran
Abhimanyu Easwaranesakal
Updated on

Abhimanyu Easwaran close to double century: इराणी कप सामन्यात मुंबईने केलेल्या ५३७ धावांच्या प्रत्युत्तरात शेष भारताकडून अभिमन्यू ईश्वरनने १५१ धावांची दमदार खेळी केलीआहे. मुंबईच्या गोलंदाजीपुढे शेष भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर परतले. यात अभिमन्यू ईश्वरन तग धरून राहिला आणि आता द्विशतकाच्या जवळ पोहचला आहे. सर्फराजने केलेल्या द्विशतकाचा बदला अभिमन्यू द्विशतकानेच घेतो का ? हे पाहणे महत्वाचे ठरले आहे.

३७ धावांवर ३ विकेट अशी मुंबईची बिकट परिस्थिती असताना कर्णधार अजिंक्य रहाणेने मुंबईचा डाव सावरला. त्याला श्रेयश अय्यरची साथ मिळाली. दोघांनी १७० चेंडूत १०२ धावांची भागिदारी केली. श्रेयश अय्यर ५७ धावांवरती परतला. पण पुढे फलंदाजीसाठी आलेल्या सर्फराजने खानसोबत रहाणेने १३० धावांची मोठी भागिदारी केली.

Abhimanyu Easwaran
Irani cup: आजाराशी झुंज देऊन Shardul Thakur मुंबईच्या गोलंदाजी ताफ्यात परतला

रहाणेचे शतक अवघ्या ३ धावांनी हूकले. रहाणेने या खेळीदरम्यान ७ चौकार व १ षटकारासह एकूण ९७ धावा जोडल्या. कर्णधार परतल्यावर सर्फराजने तनुष कोटियनला साथीला घेतले आणि मुंबईची फलंदाजी त्याच आक्रमकतेने सुरू ठेवली.

तनुष कोटियननेही १२८ चेंडूत ६४ धावांची अर्धशतकीय खेळी केली. तर सर्फराज खानने २८६ चेंडूत २२२ धावांची द्विशतकी खेळी करत मुंबईकडून खेळताना नवा विक्रम रचला. सर्फराजने या खेळीदरम्यान तब्बल २५ चौकार व ४ षटकार ठोकले. सर्फराजच्या या मोठ्या खेळीमुळे मुंबईने तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीपर्यंत मुंबईने ५३७ धावा धावफळकावर लावल्या.

Abhimanyu Easwaran
Irani Cup : 25 fours , 4 sixes! Sarfaraz Khan च्या नाबाद २२२ धावा; मुंबईने पहिल्या डावात शेष भारत संघाला झोडलं

प्रत्युत्तरासाठी उतरलेल्या कर्णधार ऋतुराजला मुंबईच्या जुनैद खानने अवघ्या ९ धावांवर माघारी पाठवले. तर दुसरीकडे अभिमन्यू ईश्वरन आक्रमक फलंदाजी करत होता. शेष भारत संघाचे फलंदाज स्वस्तात परतत असताना अभिमन्यूने आपली खेळी लावून धरली. शेष भारत संघाने पहिल्याच दिवशी ४ विकेट्स गमावले असताना त्याने संघाचा भार एकहाती सांभाळला.

अभिमन्यूने १५० धावांवर नाबाद आहे. या खेळीदरम्यान त्याने १२ चौकार व १ षटकारासह २१२ चेंडूत १५१ धावा केल्या आहेत. अभिमन्यूच्या साथीला ध्रुव जुरेल ३० धावांवर खेळत असून त्यांनी तिसऱ्या दिवसाअंतीपर्यंत ६५ धावांची भागीदारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com