ABHISHEK SHARMA : पहिल्याच बॉलवर सिक्स मारताच अभिषेक शर्माच्या नावावर मोठा विक्रम; शफिकुल्लाहचा रेकॉर्ड मोडला, सूर्या कितव्या नंबरवर?

ABHISHEK SHARMA RECORD: न्यूझीलंडविरुद्ध पहिल्याच चेंडूवर षटकार मारत अभिषेक शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला. शफीकुल्लाहचा विक्रम मोडत तो अव्वल स्थानी पोहोचला.
ABHISHEK SHARMA RECORD

ABHISHEK SHARMA RECORD

esakal

Updated on: 

ABHISHEK SHARMA RECORD: भारत आणि न्यूझीलँड यांच्यात आजपासून (२२ ऑक्टोबर) टी-२० मालिका खेळवली जात आहे. मालिकेचा पहिला सामना आज न्यूझीलँड येथील ख्राईस्टचर्च येथील हॅगली ओव्हल या मैदानावर खेळवला जात आहे. मात्र, न्यूझीलँड संघाच्या घरच्या परिस्थितीचा चांगलाच फायदा घेत भारतीय गोलंदाजांविरुद्ध चांगली फलंदाजी करत भारतापुढे मोठं आव्हान ठेवलं आहे.

२२६ धावांचा पाठलाग करायला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली होत आहे. मात्र, पहिल्याच चेंडूवर षटकार मारत अभिषेक शर्माने अफगाणिस्तानच्या शफीकुल्लाह शिनवारीचा विक्रम मोडीत काढला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com