Abhishek Sharma
पंजाबच्या अभिषेक शर्माने त्याच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवले आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून मैदान गाजवल्यानंतर अभिषेकला भारताच्या ट्वेंटी-२० संघात संधी मिळाली आहे. त्यानेही मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलं आहे. भारताच्या ट्वेंटी-२० संघात बदलाचे वारे वाहत असताना अभिषेकच्या रुपाने सक्षम सलामीवीर सापडला आहे.