India vs Pakistan
India vs PakistanSakal

Women's Asia Cup 2024: भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने! आशिया कपच्या शेड्युलची झाली घोषणा

Women's Asia Cup 2024 Schedule: महिला आशिया कप 2024 स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर झाले आहे.
Published on

Women's Asia Cup 2024 Timetable: आशिया क्रिकेट काऊन्सिलने मंगळवारी मोठी घोषणा केली आहे. आगामी महिला आशिया कप 2024 स्पर्धेचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर झाले असून यंदा देखील ही स्पर्धा टी20 प्रकारात खेळवली जाणार आहे.

महिला आशिया कप 2024 स्पर्धा श्रीलंकेत आयोजित केली जाणार असून डंबुलामध्ये सामने खेळले जाणार आहेत. 19 जूलै रोजी स्पर्धेला सुरूवात होईल, तर 28 जुलै रोजी अंतिम सामना होणार आहे. उपांत्य सामने 26 जुलै रोजी होणार आहेत.

या स्पर्धेत आशिया खंडातील 8 महिला संघ सहभागी होणार आहेत. या 8 संघांची साखळी फेरीसाठी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारतीय महिला संघाचा साखळी फेरीसाठी अ ग्रुपमध्ये समावेश आहे.

India vs Pakistan
Video: सचिन तेंडुलकरने ज्या कॅचचं केलं भरभरून कौतुक, त्यासाठी अक्षरला Team India च्या ड्रेसिंग रुममध्ये मिळालं मोठं बक्षीस

अ ग्रुपमध्ये भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, युएई आणि नेपाळ या देशांच्या महिला संघांचा समावेळ आहे. बी ग्रुपमध्ये बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंड या देशांच्या महिला संघांचा समावेश आहे.

साखळी फेरीनंतर दोन्ही ग्रुपमधील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीत विजय मिळवणारे संघ अंतिम सामन्यात प्रवेश करतील. साखळी फेरीत प्रत्येक दिवशी दोन सामने होणार आहे. प्रत्येक दिवशी एक सामना दुपारी 2 वाजता चालू होणार आहे, तर दुसरा सामना संध्याकाळी 7 वाजता चालू होणार आहे.

India vs Pakistan
Rashid Khan: बंबई से आया मेरा दोस्त! IND-AFG सेमी-फायनलमध्ये पोहोचताच राशीदची मन जिंकणारी पोस्ट, एकदा बघाच

साखळी फेरीत भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध 19 जुलै रोजी होणार आहे, त्यानंतर 21 जुलै रोजी युएईविरुद्ध भारताचा सामना होईल, तर नेपाळविरुद्ध 23 जुलैविरुद्ध भारताचा अखेरचा साखळी सामना होईल.

या स्पर्धेतील सर्व सामनाधिकारी महिला असणार आहेत, हे यंदाच्या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे.

महिला आशिया कप 2024 स्पर्धेतील भारताचे सामने

  • 19 जुलै - भारत विरुद्ध पाकिस्तान (वेळ - संध्या. 7.00 वा.)

  • 21 जुलै - भारत विरुद्ध युएई (वेळ - दु. 2.00 वा.)

  • 23 जुलै - भारत विरुद्ध नेपाळ (वेळ - संध्या. 7.00 वा.)

बाद फेरी -

  • 26 जुलै - पहिला उपांत्य सामना (वेळ - दु. 2.00 वा)

  • 26 जुलै - दुसरा उपांत्य सामना (वेळ - संध्या. 7.00 वा)

  • 28 जुलै - अंतिम सामना (वेळ - संध्या. 7.00 वा)

Chitra smaran:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com