
Snake in AFG vs ENG Champions Trophy 2025 Match : पाकिस्तानातील गद्दाफी मैदानावर काल इंग्लंड व अफगाणिस्तानमध्ये रोमहर्षक सामना झाला. शेवटच्या क्षणी अफगाणिस्तानने सामना फिरवला व इंग्लंडचा ८ धावांनी पराभव केला. पण सामन्यादरम्यान एक विनोदी किस्सा घडला. ज्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांनी पाकिस्तानमधील मैदानं आहेत की नॅशनल पार्क असा प्रश्न उपस्थित केला आहे. कारण याआधी कराची मैदानावर अनेकदा मांजर आली होती. तर कालच्या सामन्यात मैदानावर साप पाहायला मिळाला.