IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान ट्वेंटी-२० मालिकेसाठी यजमानांनी जाहीर केला संघ; विराटशी भांडणारा खेळाडू संघात परतला...

Afghanistan Name 15-Member Squad For India T20Is: भारताविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी अफगाणिस्तानने आपला १५ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघात वेगवान गोलंदाज नवीन उल हकचे जवळपास दोन वर्षांनी पुनरागमन झाले आहे.
Afghanistan squad for T20I series against India

Afghanistan squad for T20I series against India

esakal

Updated on

India vs Afghanistan T20I series Afghanistan squad: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात पुढील महिन्यात तीन सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळवली जाणार आहे आणि त्याचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. ही मालिका नवी दिल्लीत होणार असली तरी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड ( ACB) यजमानपद भूषविणार आहेत. या मालिकेसाठी यजमानांनी आपला संघ जाहीर केला आहे. या मालिकेसाठी इब्राहिम झद्रानला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. रशीद खानचाही संघात समावेश करण्यात आला आहे. मालिकेतील पहिला सामना १३ सप्टेंबर रोजी खेळला जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com