
Afghanistan head coach Jonathan Trott: आयसीसीच्या एकदिवसीय जागतिक स्पर्धेत सलग दुसऱ्या वेळी इंग्लंड संघाला बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या अफगाणिस्तान संघाला आता कोणी कमी लेखणार नाही, असे मत अफगाण संघाचे प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी व्यक्त केले आहे. ट्रॉट हे मूळचे इंग्लंडचे माजी खेळाडू आहेत.
भारतामध्ये २०२३ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेनंतर आता चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतही इंग्लंड संघाला पराभवाचा धक्का देणारी सनसनाटी कामगिरी अफगाणिस्तान संघाने केली. इब्राहिम झादरानच्या विक्रमी १७७ धावा आणि अझमतुल्ला ओमरझाईच्या पाच विकेटमुळे अफगाणिस्तानने हा विजय मिळवला. इंग्लंड संघाकडून ज्यो रूटने शतकी खेळी केली तरीही इंग्लंडला पराभवाचा सामना करावा लागला.