अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू हजरतुल्लाह झझाई ( Hazratullah Zazai ) याच्या लहानग्या मुलीचे निधन झाले. सहकारी करीम जनतने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली. या घटनेमुळे झझाई आणि त्याच्या कुटुंबाला दुःखाचा डोंगर कोसळला आहे. क्रिकेट समुदाय आणि त्याचे चाहते या दुःखद प्रसंगात त्याच्या पाठीशी उभे आहेत आणि त्याच्यासाठी प्रार्थना करत आहेत.