MUMBAI INDIANS TO RE-SIGN EX-PLAYER AS HARDIK PANDYA’S TEAM REBUILDS FOR IPL 2026
esakal
IPL 2026 team strategy and transfers: दोन वर्षापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya ) आपल्या ताफ्यात घेत इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील सर्वात मोठी ट्रेड केली होती. आता ते पुन्हा एकदा माजी खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी जोर लावत आहेत. मुंबई इंडियन्सला मागील काही पर्वात खास कामगिरी करता आलेली नाही आणि त्यांना मेगा लिलावातही अपेक्षित खेळाडू घेता आले नव्हते, परंतु आता त्यांनी IPL 2026 पूर्वी संघबांधणीसाठी रणनीती आखायला सुरूवात केली आहे. रोहित शर्मा ( Rohit Sharma) चं वय पाहता, त्याच्यासाठी बॅक अप प्लान तयार करणे, हाही मुंबई इंडियन्सच्या रणनीतीचा भाग आहे. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा संघातील माजी सलामीवीर इशान किशन ( Ishan Kishan) याच्याकडे वळवला आहे.