
पाकिस्तान संघ सध्या मायदेशात न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध तिरंगी वनडे मालिका खेळत असून चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ही मालिका होत असल्याने महत्त्वाची मानली जात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा १९ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये सुरू होणार आहे. पण केवळ भारतीय संघाचे सामना पाकिस्तानऐवजी दुबईत खेळले जाणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या स्पर्धेचे अधिकृत आयोजक आहेत.
मात्र गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधील स्टेडियम पूर्ण सज्ज नसल्याच्या चर्चा होत आहेत. यातच आता शनिवारी (८ फेब्रुवारी) घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चाहत्यांकडून जबाबदार धरले जात आहे.