

Sankalp Kalkotwar
Sakal
विदर्भ क्रिकेट असोसिएशनतर्फे नागपुर येथे सुरु असलेल्या १९ वर्षे वयाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत अहेरी येथील संकल्प अनिल कलकोटवार हा उदयोन्मुख खेळाडू ऊत्कृष्ट कामगिरी करत आहे.
संकल्प अष्टपैलू खेळाडू असून फलंदाजीसह गोलंदाजीतही अव्वल ठरत आहे. दोन सामन्यांमध्ये 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराचा तो मानकरी ठरला. प्रत्येक सामन्यात कामगिरीमध्ये सातत्य राखत असल्याने स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू ठरण्याची दाट शक्यता आहे.