Ajinkya Rahane Retirement: अज्जू रडवलंस यार..! अजिंक्य रहाणे निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना रडला, Video Viral

Ajinkya Rahane retirement emotional video viral : भारतीय क्रिकेटमधील शांत, संयमी आणि विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळखला जाणारा अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला भावनिक निरोप दिला. निवृत्तीची घोषणा करताना त्याच्या भावना अनावर झाल्या आणि काही क्षण तो अश्रू आवरू शकला नाही.
Ajinkya Rahane retirement emotional video viral

Ajinkya Rahane retirement emotional video viral

esakal

Updated on

Ajinkya Rahane Cries While Bidding Farewell to International Cricket: क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डोंबिवली ते चर्चगेट असा प्रवास करणारा युवक ते भारताचा यशस्वी फलंदाज... अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आज निवृत्ती जाहीर केली. अजिंक्य मागील तीन वर्षांपासून भारतीय संघाबाहेरच होता, परंतु त्याने त्याच्या पुनरागमनाच्या आशा सोडल्या नव्हत्या. तो देशांतर्गत क्रिकेट खेळत राहिला आणि टीम इंडियाचे दार ठोठावत राहिला. पण, भारतीय संघ युवा खेळाडूंसह भरपूर पुढे निघून गेला आहे आणि आता अजिंक्यला साथ द्यायला कसोटी संघात त्याचा मित्र रोहित शर्मा नाही, विराट कोहली नाही, आर अश्विनही नाही आणि बडी चेतेश्वर पुजाराही नाही. अशावेळी अजिंक्यने निवृत्तीचा घेतलेला निर्णय हा योग्यच वाटतोय. पण, तो जाहीर करताना अजिंक्यच्या डोळ्यात तरळलेले पाणी चाहत्यांना रडवून गेले...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com