Ajinkya Rahane retirement impact on KKR captaincy
esakal
Who will replace Ajinkya Rahane as KKR captain in IPL 2027?: अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याचवेळी त्याने सर्व फॉरमॅटलाही रामराम ठोकला, याचा अर्थ अजिंक्य आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये ना मुंबईसाठी खेळणार, ना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्ससाठी... त्यामुळेच अजिंक्यच्या निवृत्तीमुळे आता KKR ला आयपीएल २०२७ साठी नवा कर्णधार शोधावा लागेल. सध्याच्या घडीला सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) हे नाव चर्चेत आहे आणि तो मुंबई इंडियन्सची साथ सोडणार असल्याच्या अफवा सुरू आहेत.