Ajinkya Rahane : ना रोहित, ना कोहली; निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेला पहिला कॉल कुणी केला? म्हणाला, तू आणखी खेळायला हवं होतंस...

Ajinkya Rahane retirement first call from Sachin Tendulkar : भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने निवृत्तीचा निर्णय घेतल्यानंतर त्याला पहिला फोन कुणाचा आला, याचा खुलासा केला आहे. विशेष म्हणजे, हा फोन रोहित शर्मा किंवा विराट कोहलीचा नव्हता.
Ajinkya Rahane and Sachin Tendulkar after Rahane retirement

Ajinkya Rahane retirement first call from Sachin Tendulkar

Sakal

Updated on: 

Why Ajinkya Rahane decided to retire from cricket? अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि सर्व फॉरमॅटमधून घेतलेली निवृत्ती, ही चाहत्यांना धक्का देणारी ठरली. कर्णधार म्हणून 'अजिंक्य' राहिलेल्या रहाणेने कसोटी क्रिकेट गाजवले... भारतीय संघ अडचणीत असताना अजिंक्य खंबीरपणे मैदानावर उभा राहिला. पण, त्याला अपेक्षित संधी मिळाली नाही आणि त्यामुळेच निवृत्ती जाहीर करताना तो रडला... आपण क्रिकेटसाठी सर्वस्व दिले आणि हेच समाधान घेऊन त्याने निवृत्ती जाहीर केली. अजिंक्यच्या या घोषणेनंतर त्याला पहिला कॉल कोणाचा गेला असेल? महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) याने अजिंक्यला पहिला कॉल केला..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com