मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या.
दी ओव्हल कसोटीत दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेत सिराज सामनावीर ठरला.
भारताने इंग्लंडला ६ धावांनी हरवत मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.
भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) अँडरसन-तेडुलकर ट्रॉफीसाठी झालेली इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका गाजवली. सिराजने या कसोटीत पाच सामन्यांत सर्वाधिक २३ विकेट्स घेतल्या आणि दी ओव्हल कसोटीत निर्णायक कामगिरी करून भारताला मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवून देण्यात मदत केली. सिराजच्या भेदक माऱ्याने इंग्लंडला ४ विकेट्स हाती असूनही ३५ धावा करता आल्या नाही आणि भारताने ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. ३१ वर्षीय सिराजने दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या आणि ओव्हल कसोटीत ९ विकेट्स घेऊन तो सामनावीर ठरला.