Ajit Agarkar responds strongly to Mohammed Shami’s disappointment over ODI series exclusion.
esakal
Mohammed Shami vs Ajit Agarkar selection controversy : भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर याने अखेर गोलंदाज मोहम्मद शमी याच्या टीकेवर उत्तर दिले आहे. भारतीय गोलंदाजाने निवड समितीने त्याच्यासोबत संवाद साधला नसल्याची टीका केली होती आणि त्यावर आज अजित आगरकरने स्पष्ट काय ते सांगितले. त्याचवेळी आगरकरने इंग्लंड दौऱ्यासाठी शमी पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे सांगून त्यामुळेच त्याची संधी हुकली असे सांगितले. पण, त्याचवेळी ऑस्ट्रेलियाच्या वन डे मालिकेत त्याची निवड का केली नाही, हेही आगरकरने सांगितले.