Ajit Agarkar on Kohli's Test retirement decision इंग्लंड दौऱ्यासाठी नव्या दमाचा भारतीय संघ निवडला गेला आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हा संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. रिषभ पंतकडे उप कर्णधारपद दिले गेले आहे. जसप्रीत बुमराह प्रमुख जलदगती गोलंदाज म्हणून या संघात असेल, परंतु त्याच्यासोबतीला मोहम्मद शमी दिसणार नाही. अशात आजच्या पत्रकार परिषदेत एक प्रश्न येणे साहजिक होता आणि तो म्हणजे विराट कोहलीने निवृत्ती का घेतली? निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी दिलेले उत्तर आश्चर्यचकित करणारे आहे.