Ajit Agarkar News : अजित आगरकरचा करेक्ट कार्यक्रम? रोहितला नडायला गेला अन् BCCI ने गेम केला; 'त्या' वृत्तानंतर चक्र फिरली...

Rohit Sharma and Ajit Agarkar controversy: भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठ्या बदलाची चर्चा रंगली आहे. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांच्या कराराला मुदतवाढ मिळणार नसल्याची चर्चा सुरू आहे.
Dinesh Karthik on Gautam Gambhir and Ajit Agarkar

Dinesh Karthik on Gautam Gambhir and Ajit Agarkar

esakal

Updated on

Why BCCI may replace Ajit Agarkar as chief selector: रोहित शर्माच्या बाबतीत पसरवल्या गेलेल्या एका चुकीच्या बातमीने भारतीय संघातील सिस्टमच ढवळून निघाले आहे. निवड समिती प्रमुख अजित आगरकर याचे पद धोक्यात आले आहे. आगरकरचा कार्यकाळ २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत वाढवला जाईल असे मानले जात होते, परंतु नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातील दुसऱ्या वन डे सामन्यापूर्वीच रोहितची कारकीर्द संपल्याची बातमी आली. त्यानंतर बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी मुख्य निवडकर्त्याशी न बोलता रोहितच्या बाबतीत मोठे विधान केले आणि त्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com