Why no Mohammed Shami? मोहम्मद शमीची कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ जवळ आली; अजित आगरकर यांनी विधानच तसे केले

Is Mohammed Shami retiring from Test cricket? भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात संधी दिली गेलेली नाही. निवड समिती प्रमुख अजीत आगरकर यांनी दिलेल्या विधानानंतर गोलंदाजाची कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ आल्याचा अंदाज बांधला जातोय.
Mohammed Shami
Mohammed Shami esakal
Updated on

Will Mohammed Shami play another Test for India? टीम इंडियाचे निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद आज गाजली. इंग्लंड दौऱ्यावरील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी अजित आगरकर यांनी १६ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला. शुभमन गिलकडे कर्णधारपद,तर रिषभ पंतकडे उप कर्णधारपद सोपवले गेले आहे. साई सुदर्शन व अर्शदीप सिंग यांना कसोटीत पदार्पणाची संधी मिळणार आहे. पण, याचवेळी संघातील अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याचे नाव या संघात दिसत नाही. त्यामुळे रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यानंतर मोहम्मद शमीच्या कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ जवळ आलीय का, असा प्रश्न उपस्थित राहतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com