Rohit Sharma–Gautam Gambhir’s Intense Dugout Conversation
esakal
Rohit Sharma–Gautam Gambhir’s Intense Dugout Conversation: भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर १७ धावांनी विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. रांची येथे झालेल्या सामन्यात विराट कोहलीने ( Virat Kohli) खणखणीत शतक झळकावले, तर रोहित शर्मा व लोकेश राहुल ( KL Rahul) यांनी अर्धशतकी खेळी केली. विराट व रोहितने त्यांच्या वन डेतून निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा एकदा कामगिरीतून उत्तर दिले. पण, सामन्यादरम्यान रोहित व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे आणि त्यामुळे या दोघांमध्ये भांडण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.