Aman Mokhade’s match-winning century helps Vidarbha defeat Karnataka in the Vijay Hazare Trophy semi-final
esakal
Karanataka vs Vidarbha Vijay Hazare Trophy Semi Final 1 : विदर्भचा २४ वर्षीय अमन मोखाडे ( Aman Mokhade ) याने विजय हजारे ट्रॉफीतील कर्नाटक संघाविरुद्धचा सामना गाजवला. देवदत्त पडिक्कलने सातत्यपूर्ण खेळ करून विजय हजारे ट्रॉफीचा यंदाचा हंगाम गाजवला आहे, त्यामुळे तो प्रतिनिधित्व करणारा कर्नाटकचा संघ आज बाजी मारेल असे वाटत होते. पण, अमनच्या शतकी खेळीने विदर्भ संघाला विजय मिळवून दिला. अमनने दमदार खेळ करताना यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावांच्या शर्यतीत देवदत्तला मागे सोडून अव्वल स्थानही पटकावले.