
Robin Uthappa: वनडे वर्ल्ड कप २०१९ स्पर्धेत अंबाती रायुडूला भारताच्या संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यावरून बरीच चर्चा झाली होती. त्यावरून आजही भाष्य केलं जातं. अंबाती रायुडूच्या जागेवर विजय शंकर याला भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं होतं.
विशेष म्हणजे त्यापूर्वी अंबाती रायुडू सातत्याने मधल्या फळीत खेळला होता, पण त्याला संघातून बाहेर करण्यात आलं. त्यावेळी विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार होता.