

ANAYA BANGAR
esakal
Anaya Bangar Cricket Australia Decision: भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर(Anaya Bangar) सध्या चर्चेत आहे. अनायाने सोशल मीडियावर एक मोठी माहिती शेअर केली आहे. मार्च २०२७ पासून ऑस्ट्रेलियातील एलिट महिला क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी आपण पात्र असू, असं तिने सांगितलं आहे.
अनायाने सोशल मीडियावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत पत्राची माहिती शेअर केली. या निर्णयासाठी तिने दिलेल्या वैद्यकीय माहितीकडे विचार करून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्णय घेतल्याचं या पत्रात सांगण्यात आलं आहे.