
Mumbai vs Andhra In Syed Mushtaq Ali Trophy : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मुंबई आंध्राविरूद्ध सामना खेळत आहेत. या सामन्यात आंध्राच्या आघाडीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. आंध्राच्या तीन फलंदाजांनी अर्धशतकीय खेळी, ज्यामध्ये भारताचा कसोटीपटू केएस भरतने ५३ चेंडूत ९३ धावांची दमदार खेळी केली. तिघांच्या जलद खेळीच्या मदतीने आंध्राने डावात २२९ धावा उभारल्या.