आंद्रे रसेलने वेस्ट इंडिजकडून आज शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी रसेलला गार्ड ऑफ ऑनर दिला गेला
आंद्रे रसेलने या सामन्यात १५ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ३६ धावा चोपल्या.
Andre Russell gets 'guard of honour': वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला. किंग्स्टन येथे आज झालेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची दुसरी ट्वेंटी-२० लढत ही त्याच्या कारकीर्दितील शेवटची लढत ठरली. आंद्रे रसेलला दोन्ही संघांच्या खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिले आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे मैदानावर स्वागत झाले. पण, वेस्ट इंडिज संघाला रसेलला विजयी निरोप देता आला नाही. ऑस्ट्रेलियाने ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात रसेलचा आक्रमक खेळ पाहायला मिळाला आणि त्याचा एक षटकार साईड स्क्रीनला भोक पाडून गेला.