२२ चेंडूंत ११२ धावा; अनमोलप्रीत सिंगच्या शतकाने अभिषेक शर्माची खेळी व्यर्थ ठरवली; T20तील पाचव्या सर्वोच्च लक्ष्याचा पाठलाग...

Anmolpreet Singh century in Sher-E-Punjab T20 League 2026: शेर-ए-पंजाब ट्वेंटी-२० लीग २०२६च्या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना अक्षरशः धावांचा स्फोट पाहायला मिळाला. सामन्यात तब्बल ५२० धावा आणि ३९ षटकारांची आतषबाजी झाली. या सामन्यात मोहाली किंग्सचा अनमोलप्रीत सिंग सर्वात मोठा हिरो ठरला.
Sher-E-Punjab T20 League 2026

Anmolpreet Singh century in Sher-E-Punjab T20 League 2026

esakal

Updated on

Abhishek Sharma scores 77 in Sher-E-Punjab T20 League : शेर-ए-पंजाब ट्वेंटी-२० लीग २०२६ च्या पहिल्याच सामन्याच चौकार-षटकारांचा पाऊस पाहायला मिळाला. मोहाली किंग्स विरुद्ध अमृतसर सूरमा संघांमधील लढतीत एकूण ३९ षटकारांसह ५२० धावा झाल्या. भारताच्या ट्वेंटी-२० संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माची २६ चेंडूंत ७७ धावांची खेळी चर्चेत आली, परंतु त्याच्या या खेळीवर मोहाली किंग्सच्या अनमोलप्रीत सिंगच्या वादळी शतकाने पाणी फिरवले. त्याने त्याच्या ट्वेंटी-२० कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळली. हा सामना ट्वेंटी-२० इतिहासातील पाचवा सर्वात मोठा धावांचा पाठलाग ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com