RCB चा वेगवान गोलंदाज यश दयालवर बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाले आहेत.
जयपूरच्या सांगानेर पोलीस ठाण्यात १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
याआधी गाझियाबादमध्ये लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषणाचा आरोप करत दुसरा FIR दाखल झाला होता
Yash Dayal’s Name in Another Controversy : भारतीय क्रिकेटपटू यश दयाल ( Yash Dayal) याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) चा हा वेगवान गोलंदाज बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांना सामोरा जात आहे. त्याच्याविरुद्ध दोन वेगवेगळ्या एफआयआर (FIR) नोंदवण्यात आल्या आहेत.